भारतात लोकसंख्येचा स्फोट चीनलाही मागे टाकले
जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारताने चीनला मागे टाकलं असून भारत सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यूएनएफपीएने जागतिक लोकसंख्या अहवालजाहीर केला आहे. यात भारताची लोकसंख्या १४२८. ६ मिलिअन इतकी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या १४२५. ७ मिलिअन आहे. म्हणजे भारताची लोकसंख्या चीनपेक्षा२. ९ मिलिअनने अधिक आहे. गेल्या काही वर्षात चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असल्याचं या अहवलात सांगण्यात आलं आहे.
यूएनएफपीयेणे २०२३ चा जागतिक लोकसंख्या अहवाल जारी केला आहे. ‘8 बिलियन लाइव्स, इनफिनिट पॉसिबिलिटीज: द केस फॉर राइट्स एंड चॉइस’ या नावाने हा अहवाल आहे. या अहवालानुसार भारताचा एकूण प्रजनन दर 2 टक्के इतका आहे. जगातील एकूण लोकसंख्येने ८अरबचा टप्पा गाठला आहे. यूएनएफपीए च्या अहवालावर भारतातील काही प्रतिनिधींनी प्रतिक्रिया दिली आहे. भारताची १. ४ अरब लोकसंख्या ही आम्ही १. ४ संधीच्या रुपात पाहात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.