ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

राजेंना घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही या गोष्टीचा जातीधर्माच्या नावाने छात्या बडवणाऱ्याना राग आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजे यांनी त्यावेळी सतेत असलेल्या भाजपची जशी कोंडी केली होती तशीच आता सतेमध्ये असलेल्या शिवसेनेची कोंडी केली आहे . आणि म्हणूनच सेना भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत राजेंच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे.शरद पवारांनी राजेंना पाठिंबा देऊन मराठा समाजाचा त्यांच्यावर जो राग आहे तो कमी करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे आत्महत्या करण्यासारखे आहे

राज्यसभेच्या निवडणुकीच गणित तसे सोपे आहे .कारण भाजपकडे त्यांचे 106 आणि अपक्ष व मित्रपक्ष मिळून 7 म्हणजेच 113 आमदारांचे संख्याबळ आहे.सत्ताधारी महाविकास आघडीक्कडे 169 आमदारांचे संख्याबळ आहे निवडून येण्यासाठी 42 धावांची गरज आहे त्यामुळे भाजपचे 2 तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक आमदार निवडून येऊ शकतो . सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर सहाव्या जागेवर अपक्ष उमेदवार संभाजी राजे सहज निवडून येऊ शकतात पण हिंदुत्वाच्या लढाईत संभाजी राजे यांनी शिवसेना भाजपला पाठिंबा दिला नाही म्हणून या दोन्ही पक्षानी राजेचा मार्ग रोखण्यासाठी सहाव्या जागेवर उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यांना ठाऊक आहे की सहाव्या जागेसाठी आपला उमेदवार निवडून शकत नाही तरी तर उमेदवार उभा करणार आहेत हे एक प्रकारे सुडाचे राजकारण आहे .आणि हे लोक जर सुडाचे राजकारण करणार असतील तर मराठा समाजानेही याना चांगली अद्दल घडवावी . कारण मराठा समाजाचे आरक्षणासाठी झालेले आंदोलन हे एक समाजिक आदोलन होते त्याचा कुठल्याही जाती धर्माशी संबंध नाही. आणि हिंदुत्वाशी तर अजिबात नाही! आणि म्हणून तर दलीत ओबीसी आणि इतर समाजानेही मराठा आरखणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे तेंव्हा हीच बाब लक्षात ठेऊन मराठा समाजाने सेना भाजपला अद्दल घडवावी .

error: Content is protected !!