ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

यूपीतील सर्व मदरस्याना- योग दिनाच्या आयोजनाचे आदेश


लखनौ – आज आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे . त्यामुळे देशभर योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूपीतील सर्व मदरशांमध्ये, योगदिनाच्या निमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेत
युपी शिक्षण परिषदेच्या रजिस्टारने जारी केलेल्या आदेशानुसार, यूपीतील सर्व अनुदानित,विना अनुदानित, मान्यता प्राप्त मदरशांमध्ये भव्य स्वरूपात योगदिवस साजरा करावा असे आदेश गेल्या वर्षी सुद्धा जारी करण्यात आले होते. यंदा युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्या भव्यस्वरूपात योग दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यातील साडेतीन कोटी लोकांना योगदिनाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. स्वतः पंतप्रधान मोदी हे योगदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जनतेला संदेश देतील. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील ७५ मंत्री वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळी योगाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन योग करणार आहेत.पंतप्रधान कर्नाटकच्या प्रसिद्ध म्हैसूर पॅलेस मध्ये योग करतील. तर गृहमंत्री अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात योग् करतील. भूपेंद्र यादव अयोध्या,धर्मेंद्र प्रधान हिमाचल मधील कांगडा फोर्ट ,गिरीराज सिंग हरिद्वार,महेंद्र पांडे जगन्नाथपुरी मंदिर, संजीव केदारनाथ धाम किरण रिजिजू अशा प्रकारे विविध ठिकाणी केंद्रीय मंत्री उद्या योगाच्या कार्यक्रमात भाग घेतील. .

error: Content is protected !!