ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

महाराष्ट्र हादरला ! मिरज जवळ डॉक्टर कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या


सांगली/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक भयंकर घटना काल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ मध्ये घडली असून डॉक्टर वांमोरे यांच्या कुटुंबातील ९ जनानी विष घेऊन आत्महत्या केली या घटनेने मोठी खळबळ माजली असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.

घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचं काम सुरू आहे. आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.

म्हैसाळ इथल्या नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौक आलगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर इथं दुसरं घर आहे. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडा नव्हता. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरजगाव पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला

error: Content is protected !!