ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

पुन्हा भाजपने बाजी मारली सर्व उमेदवार विजयी – महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडला


मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडी सोबत असलेले उमेदवार फोडून आपला तिसरा उमेदवार निवडून आणला होता तर विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या आमदारांना खरेदी करून आपला पाचवा उमेदवार निवडून आणला . त्यामुळे घोडेबाजार झिंदाबाद असेच महाराष्ट्रातील जनता म्हणतेय
विधान परिषदेच्या 10 जागांसाठी जेंव्हा 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले . तेंव्हाच घोडेबाजार होणार हे निश्चित झाले होते आणि त्यानुसार व्यवहारही पूर्ण झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती.काल दुपारी 4 वाजेपर्यंत विधानपरिषदेच्या 285 आमदारांनी मतदान केले या मतदानाचा निकाल 5 वाजेपर्यंत अपेक्षित होता पण रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांची मते बाद झाल्याने 283 निकाल लांबला आणि नंतर 283 मतांची मोजणी झाली त्यानुसार भाजपचे श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना प्रत्येकी 30 मते पडली तर प्रवीण दरेकर याना 29 उमा खाप्रेना 28 मते पडून हे चारही जन पहिल्याच फेरीत निवडून आले तर शिवसेनेचे अमशा पाडवी आणि सचिन अहिर हे सुधा पहिल्या पसंतीची प्रत्येकी 26 मतांवर निवडून आले ज्या खडसेंना पाडण्यासाठी भाजपने फिल्डीग लावली होते ते खडसे आणि राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार रामराजे निंबाळकर निवडून आले राष्ट्रवादीची 51 मते असताना त्यांच्या उमेदवारांना 58 मते म्हणजेच 7 मते जादा मिळाली पण काँग्रेसचे दोन्ही उमेदवार लटकले आणि त्यांच्याबरोबर भाजपचे प्रसाद लाड यांच्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतमोजणी पर्यंत चुरस झाली आश्चर्याची गोष्ट अशी की काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे याना पहिल्या पसंतीची 22 मते मिळूनही ते पराभूत झाले तर भाजपच्या विजयी उमेदवारांची अतिरिक्त मते प्रसाद लाड याना ट्रान्स्फर झाल्याने लाड विजयी झाले मात्र मतांची गणिते फोडा फोडी मुळे उलट सुलट फिरल्याने भाई जगताप विजयी झाले आणि हांडोरे पडले या निवडणुकीत महारविकास आघाडीतील शिवसेनेची 2 काँग्रेसची 3 आणि आगडीला पाठिंबा देणारे अपक्ष अशी मिळून 20 मते फुटली भाजपला 133 मते मिळाली मतांचा कोटा 26 असतानाही भाजपच्या 2 उमेदवारांना प्रत्येकी 4 मते जास्त मिळाली तर अन्य दोघांना चार मते मिळाली अशा तऱ्हेने भाजपने दुसऱ्यांदा महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली .

error: Content is protected !!