दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा वारकरी सेनेची मागणी
पंढरपूर/आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आलेली आहे राज्यभरातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु त्याला वारकरी सेनेने विरोध केला आहे सरकारी पैशावर दिंड्या नको त्यापेक्षा दिंडीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांना ज्या ज्या अडीअडचणी येतात ज्या ज्या नागरी सुविधांची आवश्यकता असते त्या पुरवाव्यात आम्हाला पैसे नको वारकऱ्यांना सुविधा द्या अशी मागणी वारकरी सेनेचे अध्यक्ष ह भ प गणेश महाराज थेटे यांनी केली आहे आणि त्यांच्या या मागणीला बहुतेक वारकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे गणेश महाराज थेटे यांनी सांगितले शासनाच्या 20000 रुपये मदतीवर वारी म्हणजे वारी या भक्त रस पूर्ण शब्दावर आणि परंपरेवर आघात आहे त्यामुळे सरकारचे हे वीस हजार रुपये आम्हाला नको त्यापेक्षा वारी पंढरपूर पर्यंत कशी सुखकर होईल वारकऱ्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना कराव्या हीच खरी वारकऱ्यांसाठी मदत ठरू शकेल असेही गणेश महाराजांनी म्हटले आहे गणेश महाराज यांच्या या मागणीला वारकरी तसेच महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी करणाऱ्या संपूर्ण भाविकांनी पाठिंबा व्यक्त केला असल्याचे समजते