राहूल शेवळेंच्या गौप्य स्फोटामुळे शिवसेना नेतृत्वाचे पितळ उघडं-अखेर सेनेचे खासदारही फुटले
मुंबई/ शिवसेनेने भाजप सोबत जायचे की नाही या बाबत बंडखोर आमदारांची जी भूमिका होती तीच भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची होती आणि त्यांनीही आम्हाला युती बाबत भाजप नेत्यांशी बोलून घ्या असे सांगितले होते असा धक्कादायक गौप्य स्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे .दरम्यान आज शिवसेनेचे लोकसभेतील 8 खासदार शिंदे गटात सामील झाले त्यामुळे शिवसेनेचे आता काही खरे नाही असेच दिसते
राहुल शेवाळे यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या सोबत एक पत्रकार परिषद घेऊन त्यात एकामागोमाग एक असे अनेक गौप्यस्फोट केले ते म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या नंतर शिवसेना खासदारांची उद्धव ठाकरे यांनी एक बैठक घेतली होती या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की जर भाजप सोबत युती करायची असेल तर तुम्ही बोलणी करा माझी हरकत नाही आणि एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री होणार असतील तर माझा त्याला पाठिंबा आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले होते .तसेच युतीबाबत उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी सुधा चर्चा झाली होती मात्र शिवसेनेने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एन डी ए ल मतदान केले आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मार्गारेट आलवा याना पाठिंबा दिला ही गोष्ट भाजप नेत्यांना आवडली नाही .संजय राऊत यांच्यामुळे युती होऊ शकली नाही .उलट युतीसाठी पूर्वी आम्ही गडकरींना सुधा भेटलो होतो असेही शेवाळे यांनी सांगितले दरम्यान शेवाळे हे खोटे बोलत आहेत असे सांगून सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शेवळेंचे सर्व आरोप फेटाळले तर शिंदे गटात गेलेल्या सेनेच्या खासदारांच्या गटनेतेपदी शेवळेंची नियुक्ती करण्यात आली आहे