ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

भाजपकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू


लखनौ – भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे . मागील निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या . मात्र यावेळी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच येत्या १७ ऑगस्ट पासून भाजप देशभर मिशन ४०० प्लस मोहीम राबवणार आहे.
२०१९ मध्ये भाजपला ३०३ तर मित्र पक्षांना ५४ जागा मिळाल्या होत्या . पण २०२४ मध्ये भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. मागील निवडणुकीत काही लोकसभा मतदार संघ असे होते जिथे भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता . अशा मतदार संघांवर अधिक फोकस केला जाणार आहे. त्याच बरोबर ज्या जागा जिंकल्या आहेत त्या ठिकाणी दर महिन्याला, तर हरलेल्या जागांवर पंधरा दिवसांनी केंद्रीय मंत्री दौरे करणार आहेत. तर भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांना १७ ऑगस्ट पासून नेमून दिलेल्या लोकसभा मतदार संघात जाऊन, केंद्र आणि राज्य सरकारने ज्या लोकोपयोगी योजना राबवल्या आहेत त्याची माहिती लोकांपर्यंत पोचवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्याच बरोबर भाजपच्या सर्व खासदारांना त्यांच्या मतदार संघातील लोकांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मागील वेळेस भाजपने ज्या १४४ जागा गमावल्या होत्या . त्या लोकसभा मतदार संघांचे दौरे करून तिथे भाजपचा का पराभव झाला याची माहिती घेऊन, ती माहिती घेऊन त्याबाबतचा एक अहवाल तयार करायला सांगण्यात आला आहे. आणि याच अहवालावर त्या मतदार संघाची जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांना अभ्यास करायचा आहे. जेणेकरून मागील वेळेच्या चुका दुरुस्त करता येतील आणि नव्याने त्या मतदार संघाची बांधणी करता येईल अशी एकंदरीत रणनीती २०२४ साठी भाजपकडून आखण्यात आलेली आहे.

error: Content is protected !!