ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण समितीच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप.

उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या वतीने , समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करिता महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या शाळा, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील इ.१ ली ते ८ वी च्या (प्राथ./माध्य.)विद्यार्थ्यांना काल महापालिका शाळा क्र.२७, या ठिकाणी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे .

कोरोनाच्या महामारीमुळे सतत दोन वर्षाच्या लॉक डाऊन मुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या विद्यार्थी पालकांची आर्थिक परिस्थिती हालकीची असल्याने महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . त्यामुळे शिक्षण समितीच्या सभापती शुभांगी बेहनवाल यांनी महापालिकेच्या २२ शाळेमधील विद्यार्थ्यांना टॅब व इंटरनेट सुविधा उपलब्ध करून प्रत्येक शाळेत प्रोजेक्टर सह वर्च्युल रूम संगणकीय व इतर अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा या कार्यक्रमात केली आहे .

तसेच सर्व शाळा ह्या ४ मजली इमारतीत रूपांतरीत करून सर्व शाळेमध्ये सेमी इंग्रजी व पहिली ते दहावी पर्यंत वर्ग सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे अशी माहीती त्यानी उपस्थित सर्व केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक ,शिक्षक यांना दिली आहे .
यापुढे सर्व शाळे मध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय असावी त्याकरिता एक्वागार्ड आणि प्रत्येकी शाळे मध्ये स्वतंत्र शौचालय व बोरवेल देखील आवश्यक असल्याचे त्यांनी पटवून दिले असुन तशी मागणी सुध्दा आयुक्त डॉ . राजा दयानिधी यांना केली आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन महापालिकेच्या उपायुक्त ( शिक्षण विभाग ) प्रियंका राजपुत .
उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी .श्री .बी. एम.मोहिते. नगरसेवक व शहर प्रमुख राजेंद्र चौधरी . उल्हासनगर युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे . समाजसेवक मनोहर बेहनवाल . गणेश साळुंके . नरेश गायकवाड . विक्की भुल्लर हे उपस्थित होते .

error: Content is protected !!