होय,राष्ट्रवादी मुळेच जातीवाद वाढला राज ठाकरे यांचा पूनर्र्वृचार राष्ट्रवादी मनसे आमने सामने
पुणे/ राष्ट्रवादीच्या स्थापने नंतरच महाराष्ट्रात जातीयवाद वाढला या आपल्या विधानाचा राज ठाकरे यांनी काल पूनर्वृच्चार केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले असून मनसेचे कार्यकर्तेही तयारीत असल्याचे समजते त्यामुळे या दोन्ही पक्षात सध्या तणावाचे वातावरण असून दोन्हीकडचे कार्यकर्ते आमने सामने उभे ठाकयला मोठा राडा होण्याची शक्यता आहे
काल राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की आपण जे राष्ट्रवादी बाबत जे विधान केले होते त्यात काहीच चुकीचे नव्हते कारण १९९९ नंतरच म्हणजे राष्ट्रवादीच्या निर्माण नंतरच जातीपाती मधील द्वेष वडला त्यानंतर काही लोकांनी मला प्रोबधनकाराची पुस्तके वाचायची सल्ला दिला पण त्यांना हे ठाऊक असायला हवे की मी प्रोबधनकार यांचीही पुस्तके वाचली आणि यशवंतराव चव्हाण यांचीही पुस्तके वाचली.स्वातंत्र्याच्या ७४वर्षानंतरही आपंजातीपतीमध्ये खितपत पडले आहोत.सर्वच पक्षांकडून अजूनही वीज, पाणी रस्ते यावरच भाषणे दिली जातात त्यामुळे इतक्या वर्षात आपण काय केलं हे शोधायला हवं.साधारणपणे आपण ९९ साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच पण ९९ नंतर जतीपतीमध्ये द्वेष वाढला हे माझ वाक्य होत.आणि राष्ट्रवादीच्या निर्माणनंतर तो अधिक वाढला अस न म्हणालो होतो आधी प्रत्येकाला स्वतःच्या जातीबद्दल अभिमान होता पण राष्ट्रवादीच्या स्थापने नंतर अन्य जातीबद्दल द्वेष निर्माण झाला असे राज ठाकरे यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की जाती पतीच्या राजकारणातून निवडणुका जिंकता येतील पण पुढे जी परिस्थिती निर्माण होईल त्याचे काय?बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे मी ब्रम्हण म्हणून नाही तर इतिहास संशोधक म्हणून जतोतर पवारांकडे मराठा म्हणुन जात नाही.मराठ्यांना आरक्षण बाबत मिळणार की नाही मिळणार ते एकदाच सांगून टाका त्यांना विनाकारण झुलवत ठेऊ नका.पालिका निवडणुकीत वार्ड निहाय आरक्षण ठेवण्या ऐवजी स्त्री पुरुष असे आरक्षण ठेवा असेही ते म्हणाले त्याच बरोबर विकासाच्या मुद्द्यावरही निवडणुका जिंकता येतात असे सांगून त्यांनी मोदींची अप्रत्यक्ष तारीफ केली.
दरम्यान राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर दुसऱ्यांदा जातीपाती मध्ये द्वेष पसरवण्याचे आरोप केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकरते संतापले आहेत तर त्यांचा मुकाबला करण्यासाठी मनसेचे कार्यकर्तेही सज्ज असल्याने दोन्ही पक्षात तणाव निर्माण झाल्याचे समजते