पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गोवडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट–कारवाईत फक्त ५ डॉक्टरांना अटक
कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे सोबत वरिष्ठाचे दुर्लक्ष- – पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा
पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही
मुंबई/ कोरोंनाचे संकट सुरू असतानाच या संकट काळातही रुग्णांचे खिसे कापणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे.खास करून मानखुर्द,कुर्ला,चेंबूर आणि गोवंडी या भागात हे बोगस डॉकटर मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांची संख्या प्रचंड आहे विशेष म्हणजे पालिकेच्या आरोग्य विभागाला आणि पोलिसांनाही या बोगस डॉक्टरांची माहिती आहे .पण आर्थिक साटेलोटे असल्याने या बोगस डॉक्टरांवर केंव्हातरी लोकांना दाखवण्यासाठी थातूर मातुर कारवाई केली जाते.आताही गोवंडी मधून पाच बोगस डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे .पण गोवंडीत फक्त पाचच बोगस डॉकटर होते का ? असा सवाल करून बोगस डॉक्टरावरती ही कारवाईच बोगस असल्याचा आरोप येथील नागरिक करीत आहेत.
डॉकटर असल्याचे भासवून बोगस उपचार करणे, बनावट आणि भेसळयुक्त औषधे देणे हा गंभीर गुन्हा असून अशा गुन्ह्यात पाच वर्षापासून जन्मठेप पर्यंत शिक्षा आहे मात्र अजून पर्यंत एकाही बोगस डॉक्टरला गंभीर स्वरूपाची शिक्षा झालेली नाही. कारण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस यांच्या बरोबर त्यांची सेटिंग असते पण या सेटीगमुळे लाखो मुंबईकरांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झालाय. कारण या बोगस डॉक्टरांनी कोणतेही वैद्यकीय शिक्षण घेतलेले नसते त्यामुळे वैद्यकीय शिक्षण संस्थेचे दवाखाना चालवण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही प्रमाणपत्र नसते हे युपी, बिहार मधून येतात आणि दवाखाने उघडुन डॉकटर म्हणून मिरवतात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गर्भापात करणे] हा गंभीर गुन्हा असतानाही हे बोगस डॉकटर केवळ गर्भलिंग परीक्षणच करतात असे नाही तर बेकायदेशीर गर्भापात सुधा करतात आणि त्यात काही गर्भवती महिलांचा मृत्यू सुधा झालाय पण अशी प्रकरणे नतर दाबली गेल्याचा गंभीर आरोप इथल्या लोकांनी केलाय.
कोरोंनाचे काळात मोठे डॉकटर पेशंटला तपासात नसतं त्यामुळे काही पेशंट या बोगस डॉक्टरांकडे जात होते आणि या पेशंटना हे बोगस डॉकटर अक्षरशः लुटत होते. पण पालिकेचा आरोग्य विभाग मात्र झोपला होता की पैसे खाऊन झोपेचे नाटक करीत होता तेच काळात नाही. पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही.त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार आहे .गोवंडी मानखुर्द परिसरात गल्ली गल्लीत शेकडो बोगस डॉकटर असताना फक्त ५ बोगस डॉक्टरांना अटक होते. हाच पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा नाही काय?