ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुढाऱ्यांच्या दहीहंडीत नाच गाण्याचा धिंगाणा -दहीहंडीचे फुल मार्केटिंग -85 गोविंदा जखमी

मुंबई/कोरोनातील निर्बंध नंतर तब्बल दोन वर्षांनी मोठ्या उत्साहात दही हंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी सत्ताधारी भाजप शिंदे गटाकडून दहीहंडीचे फुल पॉलिटिकल मार्केटिंग करण्यात आले प्रत्येक दहीहंडीच्या स्टेजवर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री जात होते आणि हिंदुत्वाचा गाजर करीत होते पण त्यांची पाठ फिरतच सांस्कृतिक कार्य krmachya नावाखाली स्टेजवर अश्लील डान्सची धूम सुरू होत होती.हिंदूंच्या पवित्र सणाला बाजारी स्वरूप देण्याचा प्रकाराबद्दल मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे दरम्यान कल विविध ठिकाणी हंडी फोडताना 85 गोविंदा जखमी झाले
काल दही हंडी फोडण्यासाठी सकाळ पासूनच गोविंदा पथके रस्त्यावर उतरली होती यावेळी अनेक मोठ्या हंडयाच्या ठिकाणी स्टेज बांधून त्यावर विविध डान्सर नाचवल्या जात होत्या . दही हांदीचा सर्वात मोठा कार्यक्रम अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरात झाला या ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दही हांडीच्या कार्यक्रमात अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच ठाण्यात प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती मित्र मंडळाक्या वतीने दही हंडी उत्सवात नाच गाण्याच्या कार्यक्रमाची एक वेगळी संस्कृती दाखवली . बोरीवलीत शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दही हंडी हंडी उत्सवात सी ग्रेड अभिनेत्री शेफाली जरीवला होणे नृत्य केले जे अश्लील होते तर दही हंडीत अभिनेत्री आपूर्वा नेवळेकर आणि भाऊ कदम यांनी हजेरी लावली शिवाय या विविध ठिकाणच्या दही हंडी कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘ माधुरी पवार ‘ सीमा गोंदकर या अभिनेत्रींनी नृत्य केली स्टेज च्या खाली काही लहान गोविंदा आहेत त्यांना हे डान्स बघून त्यांच्या मनावर काय परिणाम होतील याचेही आयोजकांना भान नव्हते . दरम्यान प्रत्येक ठिकाणच्या दहीहंड्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट देऊन आगामी निवडणुकीचे मार्केटिंग करीत होते . आम्ही 50 थरांची दही हंडी कशी फोडली हे मुख्यमंत्री आर्वजून सांगत होते तर फडणवीस मोदी आणि आपल्या सरकारच्या कामाची पाठ थोपटतांना दिसत होते दरम्यान जय जवान गोविंदा पथकांस इतरही काही गोविंदा पथकांनी 9 थरांची सलामी देऊन बक्षिसांची लयलूट केली तर दादर मधली आय डी एल ची हंडी महिला गोविंदांनी फोडली काल हंडी फोडताना 85 पेक्षा अधिक गोविंदा जखमी झाले त्यातील 67 जणांवर किरकोळ उपचार करून सोडून देण्यात आले मात्र 2 वर्षांच्या नंतर या वर्षी गोविंदांचा एक आगळा वेगळा उत्साह बघायला मिळाला .

error: Content is protected !!