राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे राजीनामा देणार
पुणे/राष्ट्रवादीतील फुटी नंतर अजित पवार सरकारमध्ये सामील झाले मात्र आता राष्ट्रवादीचे मावळचे खासदार अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याने पवारांना आणखी एक मोठा धक्का बसलाय अमोल कोल्हे हे मावळ मतदार संघातून लोकसभेवर निवडून गेले होते लोकसभेतील त्यांचे काम अत्यंत चांगले होते लोकसभेतील त्यांची भाषणे ही चांगली गाजली त्यामुळे शरद पवार त्यांच्यावर खुश होते परंतु राष्ट्रवादीतील फुटी नंतर सुरुवातीला अजित दादांना सहकार्य करणाऱ्या अमोल कोल्हे नंतर शरद पवार गटात आपण राहणार असल्याचे सांगितले पण आता अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचे समजते तसेच झाले तर शरद पवारांसाठी तो एक आणखी मोठा धक्का ठरू शकेल कारण अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ट अभिनेते आणि चांगले संघटक म्हणून ओळखले जातात त्यांच्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेने महाराष्ट्रा त त्यांची घराघरात ओळख निर्माण झाली आहे एक उत्कृष्ट अभिनेता आणि उत्तम संसद पटू असलेल्या अमोल कोल्हेंवर शरद पवार यांचा फार मोठा विश्वास आहे .
