ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बदलापुरात २ चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार १० तास संतप्त नागरिक रेल्वे रुळावरआरोपीला फाशी देण्याची मागणी !


लाठीमार करणाऱ्या पोलिसनवर नागरिकांची दगडफेक
वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह ३ पोलीस कर्मचारी निलंबित

बदलापूर – तब्बल 10 तासांनी अखेर बदलापूर रेल्वे स्थानकावर पहिली रेल्वे गाडी धावली. यावेळी पोलिसांकडून सुरक्षेची सर्व काटेकोर काळजी घेण्यात आली. “मुंबई सीएसटी ते बदलापूर मार्गावर ट्रेन सुरू करण्यात आली आहे. फास्ट आणि स्लो अशा दोन्ही मार्गांवर ट्रेन सुरू झाली आहे”, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. बदलापुरातील एका नामांकीत शाळेत अवघ्या अडीच वर्षांच्या दोन चिमुडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे संतापजनक कृत्य केलं. हे प्रकरण घडून सात दिवस झाले तरीही अपेक्षित अशी कारवाई झाली नाही, असा आरोप करत संतप्त जमावाने आज बदलापूर रेल्वे स्थानकाचं कामकाज ठप्प केलं. या आंदोलनात बदलापुरातील शेकडो आंदोलक सहभागी झाली. या आंदोलकांना तब्बल 10 तास रेल्वे वाहतूक रोखून धरली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला. पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, जिल्हाधिकारी ते मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदारांनी आंदोलकांना रेल्वे रुळाहून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. पण आंदोलकांनी ऐकलं नाही. अखेर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि रेल्वे स्थानक खाली करण्यात आलं.
पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील गर्दी पांगवल्यानंतर आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक झाली. पण पोलिसांनी आंदोलकांना न जुमानता तिथून हटवलं. या झटापटीत काही आंदोलक जखमी देखील झाले. आंदोलकांनी लाठीचार्जनंतर रेल्वे स्थानकाबाहेर पोलिसांच्या दोन वाहनांची तोडफोड केली. तसेच एका एसटी गाडीवर हल्ला केला. यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना तिथून हटवलं. पोलिसांनी रेल्वे स्थानक खाली केल्यानंतर तिथे सर्वसामान्य नागरिकांना जाण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर पोलिसांनी अहवाल तयार करुन रेल्वे प्रशासनाला पाठवला.
रेल्वे वाहतुकीला आता कोणताही फटका बसणार नाही. आंदोलकांना रेल्वे स्थानकापासून हटवलं आहे. रेल्वे वाहतुकीस आता सुरक्षित वातावरण तयार करण्यात आल्याचा अहवाल पोलिसांनी रेल्वे प्रशासनाला पाठवला. यानंतर एक इंजिन रेल्वे स्थानकावर चालवण्यात आलं. जवळपास अर्धा तास ही ट्रायलची कार्यप्रणाली सुरु होती. रेल्वे वाहतुकीस वातावरण सुरक्षित असल्याची खातरजमा झाल्यानंतर या ठिकाणी सामान्य प्रवाशांसाठी वाहतूक सुरळीत करण्यात आली

error: Content is protected !!