ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
गुन्हे

तरुणाचा गळा आवळून खून; कर्जत तालुक्यात खळबळ! नेरळ पोलिसात गुन्हा नोंद; पोलिस करतात तपास!

कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यातील बोरगाव येथें एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.34 वर्षीय जगदीश अंकुश पाटील असे या मयत तरुणाचे नाव असून घटनास्थळी नेरळ पोलीस हजार झाले होते.दरम्यान या घटनेने कर्जत तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.
ओलमान ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या बोरगाव गावात राहणारा जगदीश पाटील हा पहाटे साडेपाचच्या सुमारास गावाबाहेर असलेल्या आपल्या गुरांच्या गोठ्यात नेहमी प्रमाणे गुरे चरण्यासाठी सोडायला गेला होता.त्या पाठोपाठ काही तासाने त्याचा काका सुरेश सीताराम पाटील हा देखील गेला असता,जगदीश त्याला गोठ्याच्या बाहेर निपचित,तोंडातून ब्लड बाहेर आलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. यावेळी काका सुरेश याने गावात जाऊन हा प्रकार सांगताच,,ग्रामस्थांनी जगदीश याला उचलून कळंब येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी नेले असता, उपस्थित असलेल्या डॉक्टरांना जगदीश हा मृत अवस्थेत असून त्याचा गळा दाबून मारण्यात आल्याचे समोर आल्याने,डॉक्टर यांनी याबाबत नेरळ पोलिसांना माहिती दिली होती.
दरम्यान या घटनेचे गांभीर्य ओळखून कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर,नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेन्द्र तेंडुलकर, समीर भोईर, निलेश वाणी व अन्य नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.तर यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी देखील गावाबाहेर व प्राथमिक आरोग्यकेंद्र कळंब येथे एकाच गर्दी केली होती. दरम्यान या घटनेतील खुन्यातील आरोपीचा शोध नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर हे कर्जातचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेर्डीकर यांच्या मार्गदर्शना खाली घेत आहेत.

error: Content is protected !!