ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी

मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्‍या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या उत्कृष्ट संसदपटू असून सध्या त्या जम्मू काश्मीरच्या प्रभारी आहेत . रजनी पाटील यांचे अगोदर विधांनपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत नाव होते . मात्र ही यादी रखडल्याने आता रंजनी ताईना राज्यसभेची उंमेदवारी देण्यात आली येत्या 4 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 21 सप्टेबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे .

error: Content is protected !!