ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

लेबनॉन मध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये ही बॉम्बस्फोट ७० ठार ३००० जखमी

r
बैरूट/इस्राईल विरुद्ध हमास यांच्यातील युद्धाला आता वेगळेच वळण लागलेले आहे. कारण या युद्धात इराण ही उतरलेला आहे. इस्त्राईल इराण लेबनॉन आणि हंमासला हाद्रवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धाचा आसरा घेतला आहे बुधवारी रात्री त्याचाच एक भाग म्हणून हजारो पेजर मध्ये बॉम्बस्फोट करण्यात आले यामध्ये २७७५ लोक जखमी झाले तर वीस जणांचा मृत्यू झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी लेबनॉन मधील वॉकी टॉकी रेडिओ तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये स्फोट होऊन त्यात जवळपास ५० हून अधिक लोक मारले गेले तर हजारो लोक जखमी झाले आहेत . या घटनेमुळे संपूर्ण लेबनॉन इराण आणि गाजा पट्टी हादरून गेली आहे. सध्याच्या जमान्यात मोबाईल वरील संभाषण आणि मेसेज सहजपणे ट्रेस करता येतात म्हणून हीजिबुलने मोबाईल ऐवजी पेजर आणि वॉकी टॉकी वापरायला सुरुवात केली होती त्यामुळे इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसादने पेजर आणि वॉकी टॉकी टार्गेट करून लेबनॉन मध्ये आहाकार घडवला .त्यामुळे संतापलेल्या हिजबुल्लाने इस्त्रायलची राजधानी तेल अविव शहरावर खतरनाक मिसाईलचा मारा करून बदला घेण्याचा प्रयत्न केला पण आता इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या सहाय्याने युद्ध सुरू झाल्याने जगामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

error: Content is protected !!