राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नवी दिल्ली/अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतीय युवा मोर्चाच्या तक्रारीवरून दिल्लीतील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढणार आहेत
अमेरिकेत दौऱ्यावर असताना राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की वेळ येताच आम्ही आरक्षण रद्द करू त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले अनेक ठिकाणी राहुल गांधींच्या विरुद्ध आंदोलने करण्यात आली त्यांचे पुतळे जाळण्यात आले महाराष्ट्रातील काही नेत्यांनी तर राहुल गांधींच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देण्याच्या जाहीर केले तर खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींच्या जिभेला चटका देण्याची भाषा वापरली त्यामुळे काँग्रेस आणि भाजपा यांच्या सध्या जोरदार खडा जंगी सुरू आहे दरम्यान गुरुवारी दिल्लीच्या पार्लमेंटरी स्टेट आणि अन्य पोलीस ठाण्यांमध्ये राहुल गांधींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीनंतर राहुल गांधी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते .