रस्ते आणि फुटपाथवरील चर भरणी कंत्राटदारावर पालिका मेहरबान– दोन महिन्याकरिता पुन्हा ६० कोटींची निधी
मुंबई- चर बुजवण्यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते . या सर्वांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोविडमुळे या सर्व कंत्राटदारांना एका वर्षाची मुदतवाढ मिळाली आता पुन्हा दोन महिन्याची मुदतवाढ दिल्याने पालिका कंत्राटदारावर मेहरबान असल्याचे चित्र उभे राहिले आहे . याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने त्याच त्याच कंत्राटदाराना वारवार कंत्राट मुदतवाढ देण्यात येत आहे यामागचे गौडबंगाल काय? याची चर्चा होत आहे .
चर कंत्राटदारांना एक वर्षाची मुदतवाढ दिल्यावर मुंबई जनसत्ताने बातमी छापून लोकप्रतिनिधीच्या ध्यानात आणून दिले होते . यात पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे . संबधित अतिरिक्त आयुक्त वेलरासु आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियता यांचे दुर्लक्ष होत आहे तसेच नविन निवीदा बाबत जो गोंधळ निर्माण केला गेलाय आणि त्या फेरनिविदा मागविण्यात येणार आहे . या वादग्रस्त प्रकरण्याच्या कारणे शोधण्याची गरज असल्यामुळे आता पुन्हा मुदत वाढ देवून पालिका कोणाचे भले करण्यात दंग आहे यांची चौकशी गंभीर पूर्वक महापालिका आयुक्त चहल यांनी करणे गरजेचे आहे .
मुंबई महापालिका जलअभियंता, बेस्ट यासह रिलायन्स केबल्स, टाटा आदी खासगी सेवा संस्थांकडून टाकल्या जाणाऱ्या केबल्ससाठी तसेच दुरुस्तीसाठी रस्ते व फूटपाथवर चर खोदले जातात. हे खोदलेले चर बुजवण्यासाठी मुंबईतील महापालिकेच्या सातही परिमंडळांसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात येते.. या सातही कंत्राटदारांचा कालावधी तीन वर्षांचा करण्यात आला. याची मुदत जानेवारी २०२१ रोजी संपुष्टात आली आहे. त्यानंतर त्यांना सप्टेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु नव्याने काढलेल्या निविदांनाही विलंब झाल्याने आता ही मुदत ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढवली जात आहे.