रुग्णसंख्या कमी झाल्यास दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल सुरू करणार
मुंबई/ करोना आता हळू हळू आटोक्यात येत आहे त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .मात्र तो आणखी आटोक्यात आला तर दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन च्या प्रवासास मुभा दिली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
मार्च २०२० मध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकल ट्रेन बंद होती मात्र काही महिन्यांनी अत्यावश्यक सेवामधली कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू करण्यात आली पुढे अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यावर महिलांसाठी काही ठराविक वेळेत लोकल सुरू झाली आणि लसीकरण सुरू झाल्यावर गेल्या तीन महिन्यापासून दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली मात्र करोना कमी झाला तर दिवाळी नंतर सर्वानाच लोकल प्रवासाची मुभा मिळू शकेल .