पालिका उपायुक्तांच्या घरावर इडीचा छापा
मुंबई/ कोविड काळात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे आता बाहेर येत आहेत आणि यात यांच्यापासून पालिका उपयुक्त संगीता हसनाले यांच्यापर्यंत अनेक बडे मासे इडीच्या गळाला लागले आहेत.
कोविड काळात पालिकेने स्थलांतरित लोकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ६ कोटी ७० लाखांच्या या कामात मोठा घोटाळा झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हा शाखेकडे करण्यात आली होती. याच तक्रारीवरून ईडीने पालिका उपयुक्त संगीता हसणाळे, ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांच्यासह ८ जणांवर छापे टाकून त्यांची चौकशी केली यात आणखी काही पालिका अधिकारी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश असल्याचा इडीला संशय आहे .त्यामुळे आणखी काही लोकांची चौकशी होऊ शकते.कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी यापूर्वी चौकशी झालेली आहे