ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद


मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार म्हणत आहेत. नवाब मलिक अजित पवारांसोबत आहेत .सध्या ते मुंबईच्या अनुषक्ती नगर मधून आमदार आहेत .तिथून त्यांच्या कन्या सणा मलिक ना तिकीट मिळण्याची शक्यता आहे .तर मानखुरद शिवाजीनगर मतदार संघातून अजित पवारांची राष्ट्रवादी नवाब मलिकाला तिकीट देण्याच्या विचारात आहे .या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी मतभेद होण्याची शक्यता आहे .महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंडरवर्ल्ड डॉन दाऊशी संबंधित जमीन प्रकरणात फडणवीस यांनी मालिकांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर ईडीची कारवाई झाली आणि १५ महिने मलिक जेलमध्ये राहिले. तब्येतीच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळाला .मात्र तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सत्तेवर आली .आणि अजित पवार ही सत्तेत सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादीच्या फुटी नंतर मलिकांनी अजित पवार यांना साथ दिली. हे सर्व पाहता मलिकांवरून महायुतीत दुरावा निर्माण झालेल्या आहे.

error: Content is protected !!