ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

किशोरी पेडणेकर याना एस.आर.ए. च दणका- वरळीतील चार सदनिका जप्त होणार

मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या प्रकरणात कलम 3 अ चे उल्लंघन झाल्याचे झोपू प्राधिकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता मूळ भाडेकरू विरोधात निषकासणाची कारवाई करून या सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत .आणि ही कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहे . वरळीतील झोपू योजनेतील 4 सदनिका किशोरी पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता त्यांच्या तक्रारीनंतर झोपू प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी केली तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सदनिकांची पाहणी केली असता . त्या सदनिका इतरांच्या ताब्यात असल्याचे दिसून आल्यानंतर एस आर ए ने नोटीस बजावून कारवाई केली किशोरी पेडणेकर याना हा मोठा धक्का आहे

error: Content is protected !!