विरार मध्ये बविआ – भाजपात राडा
विनोद तावडेंवर पैसे वाट्ल्याचा आरोप
विरार – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदाराना पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे व भाजप उमेदवार राजन नाईक ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे जाऊन तावडेंना जाब विचारला तसेच राजन नाईक याना धक्काबुकी केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद तावडे व राजन नाईक यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान फडणवीस यांनी मात्र विनोद तावडेंना क्लीनचीट देताना तावडेंनी पैसे वाटले नाहीत त्यांच्याकडे पैसेच नव्हते विरोधक खोटे आरोप करीत आहेत असे सांगितले
नाला सोपारा मतदारसंघातील उमेदवाराने आयोजित केलेल्या एका बैठकीत सहभागी होण्याबाबत तावडेंना आग्रह केला होता. ते तिथूनच जात असल्याने त्यांनी सहमती दर्शवली. पक्षाच्या कार्यकर्त्यांना मतदानप्रक्रियेची माहिती देण्यासाठी अशा बैठका घेतल्या जातात. संबंधित हॉटेल आणि आजबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासावेत. पाच कोटी रुपये खिशात तर आणले जाऊ शकत नाहीत. त्यांनी पुरावे दाखवावेत आणि निराधार आरोप करू नये, असे सांगत त्रिवेदी यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान पैसे वाटपावरून विरारमधील हॉटेलमध्ये मोठा राडा झाला. त्यानंतर विनोद तावडे, उमेदवार राजन नाईक आणि हितेंद्र ठाकूर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तावडेंच्या ताफ्यातील वाहनांचीही तपास करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.तावडे यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहे. महाविकास आघाडीने तावडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत महायुतीवर निशाणा साधला जात आहे. मतदानासाठी काही तास शिल्लक असतानाच हा प्रकार घडल्याने आघाडीच्या हाती आयते कोलित लागले आहे. पण महायुतीतील नेत्यांकडूनही आघाडीकडून निराधार आरोप केले जात असल्याचा पलटवार करत तावडेंना क्लिन चीट दिली जात आहे .