पहिल्याच दिवशी सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित
नागपूर -आजपासून राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरु झाले. मात्र पहिल्याच दिवशी महापुरुषांची बदनामी,कर्नाटक – महाराष्ट्र सीमावासभापतींना दिवसभरासाठी कामकाज स्थगित करावे लागले.
सीमा प्रश्नाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारकडून या प्रकरणात पहिल्यांदा हस्तक्षेप करण्यात आला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र सरकारची भूमिका माध्यमांसमोर मांडली आहे. याचे तुम्ही स्वागत करायला हवे असेही त्यांनी म्हटले. मागील अडीच वर्षात आधीच्या सरकारने निधी आणि योजना बंद केल्या होत्या त्या आम्ही सुरु केल्या असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी उपस्थित राहिल्या. सरोज यानाशिकच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार आहेत. त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही. त्यामुळे त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाल्या.
यंदा प्रथमच विधान भवन परिसरात शाईचे पेन घेऊन जाण्यास प्रतिंबध घालण्यात आला आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकी नंतर राज्यभरात हे प्रकरण गाजले होते. या प्रकरणानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून विधानभवन परिसरात शाईच्या पेनवर बंदी घालण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शाई पेनवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.