ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी

मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या

नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच () दमदार एंट्री केली आहे. तर दुसरीकडे कामठी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूडचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि प्रहारचे फायरब्रॅंड नेते अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या कुटुंबातील सदस्य उभे होते. या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे.

अनिल देशमुख यांचा गढ मानल्या जाणाऱ्या काटोल तालुक्यातील एकूण 27 जागांपैकी भाजपने 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसने तीन जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेसने आठ जागा आणि अपक्ष व शेकाप यांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर नरखेड तालुक्यातही बावीस जागांपैकी दहा जागांवर भाजपने विजय मिळवला असून एका जागेवर कॉंग्रेस, सात जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि इतरांनी तीन जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर तालुक्यातही 36 ग्रामपंचायतींपैकी सोळा जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर 14 जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला आहे. सहा जागांवर इतरांनी विजय मिळवला आहे.

आज मतमोजणी सुरू असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी-वरूडचे आमदार देवेंद्र भुयार आणि प्रहारचे फायरब्रॅंड नेते अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या कुटुंबातील सदस्य उभे होते. या तिन्ही आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना सरपंचपदी निवडून आणले आहे. विधानसभेत प्रतिनिधित्व करीत असलो तरी गावाकडे दुर्लक्ष करीत नाही, असा संदेश या तीन आमदारांनी दिला आहे.

कॉंग्रेस समर्थित पॅनलचा 82 जागांवर विजय

अमरावती जिल्ह्यात (Amravati District) एकूण 257 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये 5 ग्रामपंचायती अविरोध निवडून आल्या होत्या. यामध्ये कॉग्रेस समर्थीत पॅनलने 82 जागांवर विजय मिळविला. भारतीय जनता पक्ष 48, शिवसेना 8, प्रहार 32, वंचित 1, युवा स्वाभिमान 12, शिंदे गट 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खातेही उघडता आले नाही. तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी 52 जागांवर विजय मिळविला आहे.

error: Content is protected !!