ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

आमदार अपात्रतेवरची सुनावणी संपली -१० जानेवारीपर्यंत निकाल लागणार ?


मुंबई: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी अखेर तीन महिन्यानंतर आज पूर्ण झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, याचिका एकत्रित करणे, त्यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांच्या आमदारांची उलट तपासणी घेऊन साक्ष नोंदवणे आणि अंतिम सुनावणीतील दोन्ही बाजूंचा युक्तिवाद असं करत ही सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा असणार आहे ती अध्यक्षांकडून देण्यात येणाऱ्या या प्रकरणातील निर्णयाची.
या संपूर्ण सुनावणी प्रक्रियेमध्ये दोन्ही बाजूंकडून अनेक दावे-प्रतीदावे, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. हजारांच्या जवळपास प्रश्न आणि उपप्रश्न दोन्ही बाजूंनी विचारण्यात आले आणि त्यामुळेच या संपूर्ण तीन महिन्यातील सुनावणीमध्ये नेमकं काय काय घडलं हे जाणून घेणंसुद्धा निर्णयाआधी तेवढंच महत्त्वाचं आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर ११ मे रोजी अंतिम निकाल दिला. अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी तातडीने सुनावणी घेऊन आमदार अपात्रता प्रकरणातील निकाल देण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तीन महिन्यांनी म्हणजेच खऱ्या अर्थाने १४ सप्टेंबरला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांसमोरील सुनावणी सुरू झाली. यामध्ये अध्यक्षांसमोर दोन्ही गटाच्या बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी वकिलांची फौज लावण्यात आली.
१४ सप्टेंबरला सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून दोन्ही बाजूंनी दाखल करण्यात आलेल्या 34 याचिका एकत्रित घेण्यावरून जोरदार युक्तिवाद झाला.

error: Content is protected !!