ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

डीलाईलरोड रोडवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट सुदैवाने जिवित्तहानी नाही


मुंबई/ डीलाईलरोड  येथील ओपोलो मिल परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर चां आज सकाळी  स्फोट झाला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही .अग्निशमन दालने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली . आपलो मिल बंद पडल्यानंतर त्या मिलच्या आवारात आता विविध उद्योग धंदे  सुरू झाले आहेत, त्यात काही कपड्याचे उद्योग आहेत . यामध्ये अंदाजे अडीशे स्त्री-पुरुष काम करत आहे. या व्यवसायकाचे अग्निशमन दलाकडून परवान्याबाबत संशय व्यक्त केली जाते. ही जागा एन टी सी ची असल्याने एन टी सी चां अधिकाऱ्यांची जबाबदारी होती की इथल्या ज्या प्राथमिक  सुविधा आहेत त्यांची सध्या काय स्थिती आहे .पण त्यांचा अजिबात लक्ष नसल्याने इथे काही चुकीच्या गोष्टी घडत असतात असा आरोप इथल्या नागरिकांनी केला आहे तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या टाटा वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुधा इथल्या विद्युत पुरवठा कडे लक्ष नसल्याने अशा दुर्घटना घडतात असे इथल्या रहिवाशांचे म्हणणे आहे.

स्फोटाच्या आवाजाने स्त्री कर्मचारी धसका
     अपोलो, पेटवून व्यावसायिकांचे कपडे शिवण्याचे गारमेंट रात्री मोठ्या प्रमाणात आहे येथे दोनशे ते अडीचशे स्त्रीपुरुष कर्मचारी कार्यरत आहे यातील या घटनेचा एका कर्मचाऱ्यांनी धसका घेतल्यामुळे नायर हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठवण्यात आले.

error: Content is protected !!