बनावट सोन्याचे दागिने ठेवून ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला गंडा
महाड- सहकार क्षेत्रात काही पतसंस्थांमधून बनावट सोन्याचे दागिने ठेवून लाखो रुपयाचा गंडा संबंधित पतसंस्थांना घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत .महाड शहरातील ज्ञानदीप को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला वरील प्रकारे साडेतेरा लाख रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी सहा जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे .
ज्ञानदीप पतसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारी नुसार सोने निरीक्षक सागवेकर यांच्यासह सहा जणांविरोधात बनावट सोने ठेवून साडेतेरा लाख रुपयांचा गंडा पतसंस्थेला घातल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे .