अक्षय शिंदेंचे एन्काउंटर संशयास्पद – न्यायालयाने ५ पोलिसांना दोषी ठरवले
मुंबई – अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस आढळले नाहीत असं म्हटलं आहे. पाच पोलीस अधिकार्यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला. अक्षय शिंदेला दुसऱ्या प्रकरणात तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटते एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. अक्षयने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ केलेल्या कारवाईत अक्षय मारला गेला असं पोलिसांचा दावा होता. पण तो कोर्टात टिकला नाही.
“स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला हे पोलिसांच म्हणण पटणार नाही. हे संशयास्पद आहे” असं न्यायालयीन चौकशीच्या अहवालात म्हटलं आहे. कायद्यानुसार योग्य ती कारवाई करू अशी सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली. “ही बनावट चकमक आहे असं आमच म्हणणं होतं. त्यासाठी गुन्हा दाखल करावा. न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा अशी आमची मागणी होती” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या वतीने खटला लढणाऱ्या वकिलाने सांगितलं. “ही बनावट चकमक असून एकप्रकरची हत्या आहे हे मॅजिस्ट्रेटच्या अहवालातून समोर आलं आहे. आता पुढच्या कारवाईवर आमच लक्ष असेल” असं अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचे वकील अमित कटारनवरे म्हणाले. आज न्यायाधीश रेवती मोहिते आणि न्यायाधीश नीला गोखले यांनी मॅजिस्ट्रेटच्या अहवालाचा आढावा घेतला. पोलीस व्हॅनमध्ये असताना अक्षयने बंदूक खेचून घेतली. गोळीबार केला. त्यात एक पोलीस जखमी झाला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ आम्हाला गोळीबार करावा लागला असं पोलिसांच म्हणणं होतं.