ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

पावनखिंड’ सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड


पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच 18 फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
       स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ (Pawankhind) पहिल्याच दिवस सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

स्वराज्याची सेवा, राजांशी निष्ठा, गनिमांचा खात्मा, मृत्यू समोर उभा ठाकला तरी केली जाणारी वचनपूर्तता हे सर्व गुण शिवरायांच्या मावळ्यांच्या रक्तात अक्षरश: भिनले होते. त्याच पवित्र रक्तानं पावन झालेल्या घोडखिंडीचा इतिहास ‘पावनखिंड’ सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेते अजय पूरकर यांनी या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडेंची भूमिका साकारली आहे.
पावनखिंड’ सिनेमाचे लेखक-दिग्दर्शन अभिनेता दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अंकित मोहन, अक्षय वाघमारे, वैभव मांगले,  हरीश दुधाडे, बिपीन सुर्वे, सचिन भिलारे, अजिंक्य ननावरे, सुनील जाधव, माधवी निमकर, प्राजक्ता माळी, रुची सवर्ण, उज्ज्वला जोग, दीप्ती केतकर, सुरभी भावे, क्षिती जोग, समीर धर्माधिकारी, आस्ताद काळे, ऋषी सक्सेना,शिवराज वायचळ, संतोष जुवेकर, राजन भिसे, विक्रम गायकवाड, आदी कलाकारांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

error: Content is protected !!