ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

समुपदेशन कीट मध्ये रबराचे लिंग अंगणवाडी सेविका संतप्त


मुंबई/ देशाच्या ग्रामीण भागातील जनतेत कुटुंब नियोजनाचा संदेश पोचवण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये लैंगिक शिक्षण देण्यासाठी सरकारने जे कुटुंब नियोजन किट तयार केले आहे त्यात रबरी लिंगाचा समावेश असल्याने मोठी खळबळ माजली आहे.अंगणवाडी सेविकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तर टी आक्षेपार्ह वस्तू किट मधून वगळली नाही तर आंदोलन करू असा इशारा भाजपने दिला आहे.
ग्रामीण भागातील जनतेत कुटुंब नियोजनाची माहिती आणि प्रसार व्हावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे प्रयत्न करीत आहे.केंद्र सरकारच्या एन आर एच एम योजने अंतर्गत व राज्य सरकारच्या सार्वजनिक विभागाच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील महिलांचे कुटुंब नियोजनाबाबत समुपदेशन केले जाणार आहे तसेच त्यांना दोन मुलांमधील अंतर ठेवण्यासाठी काय करायला हवे गर्भधारणेच्या काळात तसेच प्रसूती झाल्यानंतर महिलांनी कशाप्रकारे लैंगिक स्वच्छता पाळावी या काळात कोणती काळजी घ्यावी यासाठी अगण वाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांचे समुपदेशन केले जाणार आहे त्यासाठी महिलांना समुपदेशन किट चे वाटप केले जाणार आहे पण या कीत मध्ये रबरी लिंगाचा समावेश असल्याने त्याबाबतची माहिती देताना अंगणवाडी सेविकांना संकोच निर्माण होतोय त्यामुळे ही आक्षेपार्ह वस्तू त्या किट मधून काढून घ्यावी अशी मागणी केली जात आहे तसेच भाजपने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे त्यामुळे ही कीट वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे

error: Content is protected !!