ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी


मुंबई/मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी भूषण गगराणी यांची नियुक्त करण्यात आली आहे तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदी कैलास शिंदे यांची वर्णी लागलेली आहे भूषण गगराणी हे 1990 च्या कॅडरचे आयएएस अधिकारी असून प्रशासनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे महाराष्ट्रातली मुख्य सचिव नगर विकास खात्याचे अतिरिक्त सचिव आधी मोठ मोठ्या जबाबदाऱ्या समर्थपणे पेलेल्या आहेत अशावेळी मुंबई महानगरपालिकेसारख्या आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महानगरपालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी त्यांना सांभाळायचे आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रशासक आहे अशा स्थितीत नागरी सुविधांची काही कामे काही प्रकल्प रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता गगराणी यांच्यावर आहे गगराणी यांच्या कार्यकाळात मुंबईचा निश्चितपणे चांगला कायापालट होईल असा विश्वास मुंबईकर व्यक्त करीत आहेत

error: Content is protected !!