दिशा सालीयान मृत्यू प्रकरणी एस आयटी चौकशी अहवाला वरून सत्ताधारी आक्रमक
मुंबई/अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियान हिच्या हत्येची चौकशी करणाऱ्या एस आय टी अहवालाचे पुढे काय झाले असा सवाल करीत सत्ताधारी महायुतीच्या आमदारांनी विधानसभेत गोंधळ घातला त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्ये नंतर त्याची सेक्रेटरी दिशा सालियान हिचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता.या प्रकरणी , या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती . आदित्य ठाकरे यांचाही या प्रकरणात सहभाग होता असा आरोप करण्यात आला होता पण सुरुवातीला दिशाच्या वडिलांनी मात्र या आरोपाचा इंनकार केला होता. या प्रकरणी महिला आयोगानेही त्यावेळी चौकशीचे आदेश दिले होते.पण त्यानंतर मात्र ही प्रकरण हळू हळू शांत झाले आता ५ वर्षांनी या प्रकरणी दिशाच्या वडिलांनी चौकशीची मागणी केल्यांन व न्यायालयात धाव घेतल्याने पुन्हा ही प्रकरण चर्चेत आले आहे. त्यावेळी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेण्यात आली होती त्याच्या चौकशीचे काय झाले असा सवाल भाजपचे अमित साटम, मंत्री नितेश राणे व मंत्री शंभूराज देसाई यांनी केला ज्याच्या विरुद्ध चौकशी सुरू आहे त्याला अटक करावी अशी मागणी राणे व देसाई या दोन मंत्र्यांनी केली. त्यावर चौकशी सुरू आहे आणि त्यातून जे काही निष्पन्न होईल त्यावर कारवाई करू असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.
