ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

तुझे माझे जमेना पण…


महाराष्ट्रासारख्या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल वाटत नाही.भाजपने किती जारी कांगावा केला किती जारी पोलखोल्यात्रा काढल्या तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका स्वबळावर जिंकणे त्यांना शक्य नाही म्हणून तर मनसेच्या इंजिनाच्या मागे धावायला लागले आहेत .पण त्याचा महाराष्ट्रात जरी भाजपला थोडाफार फायदा झाला तरी हिंदुत्वाच्या मुद्द्याचा राज ठाकरे यांना तर फायदा होणार नाहीच पण राज ठाकरे यांच्यामुळे भाजपचा युपी बिहार मधला जनाधार कमी होईल नशीब हे सगळ युपी विधानसभेच्या पूर्वी घडले अन्यथा भाजपला युपी मध्ये 200 जागाही मिळाल्या नसत्या . राजला जवळ केले तर हिंदू मतांमध्ये आणखी एक वाटेकरी निर्माण होईल .यात भाजपचे नुकसानच आहे त्यामुळेच मनसे बरोबर युती करण्याच्या मुद्द्यावर भाजप मध्येच दोन मत प्रवाह आहेत.काहींना वाटते की मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी मनसे बरोबर युती करणे आवश्यक आहे तर काहीना वाटत आहे की राज ठाकरे किती जरी पट्टीचे वक्ते असेल आणि महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाची फारशी संघटनात्मक ताकत सुधा नाही .मग अशा पक्षा सोबत भाजप सारख्या राष्ट्रीय पक्षाने का जावे? आणि म्हणूनच भाजप आणि मनसेची युती होणे शक्य नाही .कारण अगोदरच भाजपच्या एन डी ए आघाडीत खायला कार आणि भुईला भार अशा मित्रांची भाऊगर्दी वाढलेली आहे त्यात आणखी मनसेचे लचांड कशाला? असा विचार करणारा एक मोठा वर्ग भाजपात आहे भाजपच्या मूळ विचारधारेशी घट्ट बांधिलकी असलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची अधिक संख्या आहे अशा निष्ठावंतांना नारोबा गणोबा यांच्या सारख्या उपऱ्यांची अलार्जी आहे .त्यामुळेच भाजपा नेतृत्वाची गोची झाली आहे

मनसेला जवळ करण्याबाबत कुणीही भाजपा नेता उघडपणे काहीच बोलत नाही याचे कारण हेच आहे की भाजपला उत्तर भारतीय पट्ट्यात त्यांचा जनाधार आहे तो राज ठाकरे यांच्यामुळे गमवायचं नाही .राहता राहिला सवाल अयोध्या यात्रेमध्ये राज ठाकरे यांचे हिंदुत्व खरोखरच देशवासीयांच्या पचनी पडेल का ?

error: Content is protected !!