पालिका सहाय्यक अभियंता -निशिकांत मधुकर लुमन निवृत्त होणार
मुंबई/पालिकेच्या आरोग्य पायाभूत सुविधा कक्ष विभागातील सहाय्यक अभियंता निशिकांत मधुकर लुमन हे एप्रिल महिन्यात सेवा निवृत्त होणार आहेत.
सन 1986 मध्ये कनिष्ठ अभियंता लुमन पालिकेच्या जल नियोजन आणि संशोधन विभागात रुजू झाले. त्यानंतर त्यांनी परिरक्षण, इमारत व कारखाने, इमारत प्रस्ताव, बाजार विभाग आदी ठिकाणी उत्कृष्ट सेवा बजावली . विशेष काही भूमाफियानी सांताक्रूझ (जुहू) येथील पोलीस परेड ग्राउंड भूखंडावर झोपडपट्टी वासियानी अतिक्रमण केले होते .तो भूखंड पोलीस डीसीपी पटनाईक व पालिका अभियंता होने याच्या मार्गदर्शनाखाली हटवण्याचे कामात मोलाचे योगदान लुमन याचे होते. असा एक कर्तव्यदक्ष अधिकारी आता पालिकेच्या सेवेतून निवृत्त होत आहे.