राजचा अयोध्या दौरा स्थगीत
मुंबई/ येत्या 5 मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता पण या दौऱ्याला उत्तर भारतीयांचा जो विरोध होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत आपण 22मे चां जाहीर सभेत बोलू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहे
राजं ठाकरे यांनी गुडी पाढव्या चां मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यान विरोध करून हिंदुत्वाची भगवी शाल अंगावर घेतली होती तसेच मशिदींवरील भोंग्याच्य विरोधात हनुमान चालीसा पठण करण्याचे आदेश दिले होते आणि तेंव्हापासून महाराष्ट्रात हिंदुत्वाला आणि हनुमान चलीसाला एक वेगळीच धार आली होती .त्यातच राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्याने वातावरण अधिकच भगवे झाले होते ,मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याल भाजप खासदार ब्रीज भूषण यांनी विरोध केला होता त्यासाठी उत्तर प्रदेशातील लोकांना भडकावले त्यामुळे राजने परप्रांतीय विरोधी भूमिका घेऊन मुंबईत उत्तर भारतीयांना जी मनसेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती त्यासाठी त्यांनी माफी मागावी तरच त्यांना अयोध्येत पाय ठेवायला देऊ अशी भूमिका घेतली होती