ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबईराजकीय

सुरक्षा वाटपाचा बाजार


सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्या सारख्या लोकांना कुठल्या निक्षावर सुरक्षा देण्यात आली आहे तेच कळत नाही या लोकांनी सतत चर्चेत राहण्यासाठी स्वतःच वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद निर्माण केले आहेत आणि अशा लोकांना वाय प्लस दर्जाची जेंव्हा सुरक्षा दिली जाते तेंव्हा चीड निर्माण होते.संजय राऊत याचे शिवसेनेसाठी काय योगदान आहे आणि आता तरी त्याने येवढे काय तीर मारले आहेत? नेहमी न्यूज चॅनलच्या कॅमेरा समोर यायचे आणि कोणावरही टीका टिप्पणी करून फुकटची प्रसिध्दी मिळवायची.आणि अशी माणसे जेंव्हा एखाद्यावर टीका करीत असतात तेंव्हा त्यांना छत्री निर्माण होतात मग अशा लोकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना सरकारने का आणि कोणत्या निकाशावर सुरक्षा दिली जाते? किरीट सोमय्या यांच्या बाबतीतही तेच आहे उठ सूठ शिवसेनेवर टीका करायची त्यामुळे अशा माणसाला शत्रू निर्माण होणारच आणि अशा माणसाला एन एस जी ची सुरक्षा हा एक प्रकारे विनोदच म्हणावा लागेल.आणि त्याही पेक्षा मोठा विनोद काय असेल तर कंगना राणावत हीच्यासारख्या फालतू वाद निर्माण करणाऱ्या बाईला दिलेली वाई दर्जाची सुरक्षा! कंगना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सतत टीका केली त्यामुळेच तिला सुरक्षा प्रदान करण्यात आली त्यानंतर सत्ताधारी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर सतत टीका करणाऱ्या नवनीत राणा हिला दिलेली सुरक्षा सुधा वादाच्या भोवऱ्यात आहे.नवनीत राणा हिने सुधा उद्धव ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर सतत टीका केली त्यामुळे तिलाही सुरक्षा ! राज्यात महाविकास आघाडीचे तर केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात जो बोलेल त्याला केंद्राकडून सुरक्षा ! अरे पण सुरक्षा म्हणजे काही सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद आहे का सहजपणे कुणाच्याही हातावर ठेवायला ? केंद्राकडून किंवा राज्य सरकारकडून सुरक्षेची अशी खिरापत का वाटली जात आहे? मुळात पुढाऱ्यांना सुरक्षा हवीच कशाला ? कारण आज जनता असुरक्षित आहे तर पुढारी सुरक्षित आहेत मग जे सुरक्षित आहेत त्यांना कशासाठी सुरक्षा? याउलट जनता असुरक्षित आहे.एस टी स्टँड, रेल्वे स्टेशन,मार्केट,सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणांवर कधी काय होईल याचा नेम नाही.त्यामुळे जनतेला सुरक्षेची गरज आहे

मग जनतेला सुरक्षेची गरज असताना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ठेवण्या ऐवजी पुढाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा दिली जात आहे .हा एक प्रकारे जनतेवर अन्याय आहे .बरे राज्यपाल,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,गृहमंत्री यासारख्या अती महत्वाच्या लोकांना सुरक्षा दिली तर ठीक आहे .फालतू वाद निर्माण करून आ बैल मुझे मार या म्हणी प्रमाणे स्वतःहून शत्रू निर्माण करणाऱ्या लोकांना सुरक्षा का? सुरक्षा व्यवस्थेत मनुष्य बळ कमी आहे मुंबईसारख्या महानगरात 3 कोटीहून अधिक लोकसंख्या आहे आणि येवढ्या लोकसंख्येची सुरक्षा व्यवस्था फक्त 45 हजार पोलिसांच्या खांद्यावर! त्यातील 25 टक्के सुरक्षा रक्षक पुढाऱ्यांच्या सेवेत हा केवढा मोठा अन्याय ? म्हणूनच पुढाऱ्यांच्या सुरक्षेबाबत फेरविचार व्हायला हवा ज्यांना भीती वाटतेय त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून सुरक्षा घ्यावी पण आपल्या सुरक्षेच्या खर्चाचा भार सरकारवर टाकू नये .

error: Content is protected !!