ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

डिलाई रोड मधील शिवसेनेचा पोलिंग एजंट आणि नागरीक हरि याचा मृत्यू


मुंबई/सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र या मतदानाच्या वेळी डीलाय रोड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली . डीलाई रोडच्या बीडीडी चाळ क्रमांक 20 जवळ असलेल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचा पोलिंग एजंट म्हणून हजर असलेल्या मनोहर नलगे काका यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे
डीलाई रोडच्या बीडीडी चाळी जवळच्या वीस क्रमांकाच्या इमारतीजवळ मस्कर उद्यानात असलेल्या पोलीग बूथवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा पोलिंग एजंट म्हणून मनोहर नलगे काका उपस्थित होते .मात्र दुपारी उष्णता भयंकर असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे त्यांना केएम रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले पण तिथे हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला .पोलिंग एजंट म्हणून मतदान केंद्रावर काम करणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची मुंबईतील ही पहिलीच घटना आहे त्यामुळे नलगे यांच्या मृत्यूबद्दल शिवसैनिक आणि इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही तीव्र दुःख व्यक्त केले आहे

पोलिंग ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी ज्या कंत्राट कंपणीला काम दिले त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे कारण ज्या व्यवस्था मंडप ‘ फॅन । खुर्ची ‘ टेबल यां चा पुरवठा करणे गरजेचे असताना त्यांनी त्या पुरवल्या नाहीत. त्यामुळे अनेक कर्तव्य कर्मचारी आणि नागरिक यांना उष्णता त्रास सोसावा लागला . त्यामुळे डिलईरोड मधील लक्ष्मी निवास इमारत मधील नागरीक हरि मतदान करून आल्यावर यांचाही मृत्यू झाला .

error: Content is protected !!