ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेनेत मोठे बंड- सरकार कोसळणार


मुंबई/ नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडा नंतर शिवसेनेत तिसरे मोठे बंड झाले असून यावेळी या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे तब्बल 35 आमदार असून हे सर्व जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने कोणत्याही क्षणी महवि कास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहे
कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला कारण शिवसेनेचे 35 आमदार मुंबई सोडून सुरत मध्ये गेले तिथे त्यांची भाजपचे गुजरत प्रदेशाध्यक्ष एच के पाटील यांनी चांगली बडदास्त ठेवली दरम्यान या घटनेनंतर शिवसेनेने वर्षावर एक बैठक घेतली या बैठकीला फक्त 18 आमदार हजर होते त्याच बैठकीत शिंदे यांची गटनेते पदावरून हकालपट्टी करून अजय चौधरी यांची गटनेते पदी निवड करण्यात आली . त्यामुळे शिंदे अधिक चिडले दरम्यान शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक याना सुरतला पाठवण्यात आले त्यांनी एकनाथ शिंदेंची भेट घेऊन 40 मिनिटे चर्चा केली शिंदेंनी काही अटी ठेवल्या त्यात महाविकास आघाडी सोडून भाजप बरोबर युती करण्याची प्रमुख अट होती . मात्र ती मान्य झाली नाही दरम्यान शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच संध्याकाळी महाविकास आघाडीची बैठक झाली त्यात ड्यामेज कंट्रोल करण्यावर चर्चा झालीं मात्र आता सरकारचे कठीण आहे .

error: Content is protected !!