ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

अमेरिकेत मोदींच्या उपस्थितीत योगदिन साजरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात योगासने प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला जगभरातील विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. योग दिनाच्या कार्यक्रमात विविध देशांचे नागरिकत्व असलेली लोक पहिल्यांदाच इतक्या प्रमाणात सहभागी झाले होते. हादेखील एक विक्रम आहे. त्याची दखल गिनिज बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली.
योग दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी छोटेखानी भाषण केले. त्यांनी म्हटले , 9 वर्षांपूर्वी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव सादर करण्याची संधी मिळाली होती. योग हा भारतातून आलाय, पण कॉपीराइट आणि पेटंट, रॉयल्टी मुक्त असल्याचे त्यांनी म्हटले.
ही जीवन जगण्याची पद्धत आहे. विचार आणि कृतींमध्ये सजग राहण्याचा हा एक मार्ग आहे. स्वतःशी, इतरांशी आणि निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा हा एक मार्ग आहे. निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी योगाच्या शक्तीचा उपयोग करूया असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. योगासने तुम्ही सामुदायिकरीत्या अथवा एकटेपणाने देखील करू शकता. योगासने हे सर्व धर्म आणि संस्कृतीसाठी असल्याचेही त्यांनी म्हटले.

error: Content is protected !!