ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे

मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.
महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल दिला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले.
मगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात भेट देत काही कागदपत्र सादर करण्यास सांगितल्याचे समजते. त्यानंतर बुधवारी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकले. दरम्यान, ईडीच्या छाप्यानंतर पालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

error: Content is protected !!