नीट परीक्षा घोटाळ्यात तेजस्वी यादव चा हात?
पाटणा/सध्या संपूर्ण देशभर गाजत असलेला वैद्यकीय क्षेत्रासाठीच्या नीट परीक्षा घोटाळ्यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव यांचा हात असल्याची माहिती हळूहळू उघड होत आहे कारण या प्रकरणातील मास्टरमाइंड चे तेजस्वी यादव यांच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले आहे आणि या दोघांची अनेक वेळा भ्रमणध्वनीवरून बातचीत झाल्याचेही उघडकीस येत आहे त्यामुळे तेजस्वी यादव याने आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर भाजपा सरकार मात्र तेजस्वी यादव च्या गळ्याभोवती फास आवळण्याच्या प्रयत्नात आहे .दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र यादव यांनी काल पत्रकार परिषद घेऊन नीट घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचे सांगितले तसेच या प्रकरणात कोणी कितीही मोठा असला तरी त्याला सोडणार नाही पण त्याचबरोबर या परीक्षेची संबंधित लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य जोडलेले असल्याने नीट ची परीक्षा रद्द केली जाणार नाही पण अशा परीक्षांमध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील त्याचबरोबर या परीक्षांचा कारभार अत्यंत पारदर्शकपणे होईल याची ग्वाही काल शिक्षण मंत्र्यांनी दिली तर दुसरीकडे नीट परीक्षा पेपर लीक घोटाळ्यात काँग्रेस देशभर आंदोलन करणार आहे
