ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

दहीहंडी,गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होणार- सनांवरील निर्बंध हटवले


मुंबई/ कोरोनचा प्रभाव ओसरताच आम्ही किती पक्के हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी यंदा नव्या सरकारने सानांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव दणक्यात साजरा होणार आहे .
गेल्या दोन वर्षात कोरोणामुळे सण साजरे करता येत नव्हते कोरोणचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सन साधेपणाने घरातच साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच दहीहंडी गणेशोत्सव नवरात्रोत्सव या उत्सवात गर्दी होऊ नये म्हणून अनेक कठोर निर्बंध लादले होते पण आता करोना गेला आणि राज्यात सतांतर झाले आहे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे त्यामुळे हिंदूंना खुश करण्याचा पहिला प्रयत्न काल या सरकारने केला त्यानुसार काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सणांवरील निर्बंध हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . त्यानुसार गणेशोत्सव पूर्वी रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आलेत तसेच मंडपाच्या परवांगीपासून इतर सर्व परवाणासाठी एक खिडकी योजना राबवली जाणार आहे त्यामुळे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना सर्वत्र ठिकाणी फिरायची आवश्यकता नाही .गणेशाच्या आगमनासाठी विसर्जनासाठी मिरवणुकांवर जी बंदी घालण्यात आली होती ती उठवण्यात आल्यानं आता वाजत गाजत बाप्पाचे आगमन आणि विसर्जन होणार आहे . करोनामुळे गणरायाच्या मूर्तीच्या उंचीवर जी मर्यादा घालण्यात आली होती ती हटवण्यात आली आहे. ध्वनीक्षेपकाच्या बाबतीत मंडळांनी स्वतःच मर्यादा पाळाव्यात मात्र पोलिसांनी उत्सव मंडळांना त्रास देऊ नये असे सांगण्यात आले आहे तर दहीहंडी बाबत न्यायालयाचे जे नियम आहेत त्याच्या आधीन राहून दहीहंडी उत्सव साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्यात त्यामुळे या वर्षी सर्वत्र सन धूमधडाक्यात साजरा होणार आहेत

error: Content is protected !!