भाजपा विधानसभेच्या १५५ ते १६० जागा लढवणार मुख्यमंत्री पदाबाबत ही अनिश्चितता
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच दोन दिवसांच्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर विचारमंथन झाले त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने १५५ पेक्षा कमी जागा लढवू नयेत असे सर्वच नेत्यांचे मत आहे त्यामुळे भाजपा १५५ ते १६० जागा लढवणार आहे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याच्या नावाची घोषणा केली जाते, परंतु यावेळी मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल याबाबत कुठलेही निश्चित भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपाने जर १५५ जागा लढवल्या आणि त्यांच्या शंभर जागा निवडून आल्या तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होऊ शकतात. भाजपच्या या निर्णयामुळे महायुतीतील शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या पोटात भीतीने गोळा आलेला आहे. कारण या दोन्ही पक्षांना शंभर पेक्षा अधिक जागा हव्या आहेत परंतु जर भाजपाने १५५ ते १६० जागा लढवल्या तर या दोन्ही पक्षांच्या वाट्याला जेमतेम १३0 ते १४०जागा येतील त्यामुळे त्यांना ६० किंवा ७० जागांवर समाधान मानावे लागेल म्हणूनच आत्तापासूनच या दोन्ही पक्षांमध्ये चलविचल सुरू झालेली आहे खास करून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते आक्रमक झाले असून १०० पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत अशा आक्रमक परिस्थितीत ते आहेत त्यामुळे महायुतीचे काही खरे नाही असेच बोलले जात आहे
