ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

ध्वनी प्रदूषण याची तात्काळ सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई/विविध धार्मिक उत्सव तसेच रस्त्यावरील मंडप आणि मशिदींवरील भोंगे यांच्यातून होत असलेले ध्वनी प्रदूषण लक्षात घेऊन उद्या मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती २०१६ मध्ये या जनहित याची केवळ सुनावणी होऊन सरकारने यावर कठोर उपाययोजना कराव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावली करण्यात सरकारला अपयश आले त्यामुळे पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती आणि या अवमान याची केवळ तात्काळ सुनावणी घेण्याची न्यायालयाला विनंती केली होती परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ही विनंती फेटाळली आहे या अवमान याचिकेवर तातडीने सुनावणी घेणे शक्य नाही असे न्यायालयाने सांगितले आहे त्यामुळे अवमान याचिका दाखल करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे त्याचबरोबर पुढील दोन महिन्यात विविध उत्सव आहेत त्यामुळे अशा उत्सवांच्या काळात ध्वनी प्रदूषण विरोधी कारवाई करणे सरकारला शक्यच होणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकार विरोधातील आव्हान याचिकेवर पुढील काही दिवसात सुनावणी होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे

error: Content is protected !!