ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर

मुंबई – यंदा गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पालिकेने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार मंडप बांधताना खड्डे पडल्यास प्रत्येक खाद्यामागे २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . मंडपात प्रतिबंधित जाहिराती लावण्यास मनाई आहे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडपाची उंची मात्र ३० फुटांचं असायला हवी
काही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं जोरदार आगमन होणार आहे. सार्वजनिक गणपती मंडळांनीही मोठी तयारी केली आहे. मुंबई महापालिकेने सर्व गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
यंदा गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही पण मंंडळाच्या मंडपांची उंची ही 30 फूट असायला हवी. त्यामुळे यंदा 30 फूटापेक्षा उंच मंडप उभारून चालणार नाही. मंडप बांधलेल्या ठिकाणी रस्त्याच्या परिसरामध्ये तुम्ही खड्डा केलेल्या मंडळांना 2000 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे.

मंडळाचा मंडप हा 25 फूटांपेक्षा जास्त उंच असेल तर मंडप बांधणीचा अहवाल हा मुंबई महापालिकेला द्यावा लागणार आहे. त्यासोबतच प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावण्यास मनाई करण्यात आली आहे. मनपाची लोकांच्या उपयोगी पडणारी भित्तीपत्रकं मंडळांना लावावी लागणार आहेत

error: Content is protected !!