ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

ठाकरे बंधू एकत्र येणार?

मुंबई/शिवसेनेतून एकाच वेळी 40 आमदार फुटल्याने शिवसेनेची हालत खराब आहे अशा स्थितीत पुन्हा एकदा ठाकरे बांधून एकत्र आणण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.काल याबाबत सेना मनसे एकत्र येणार का या प्रश्नावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी म्हटले की त्यांनी साद घातल्यावर बघू असे सूचक उत्तर दिले त्यामुळे साद प्रतिसादाचा शेवट गोड होणार का याची महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना उत्सुकता लागलेली आहे
शिवसेनेत आता हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार खासदार राहिले आहेत अशा स्थितीत आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेतील सत्ता राखण्याचे अवघड आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे परिणामी त्यांना या क्षणी मदतीची अपेक्षा आहे.काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांवर त्यांचा फारसा भरोसा नाही अशा स्थितीत रक्ताच्या नात्यातील कुणी मदतीसाठी जवळ येणार असेल तर ते त्यांना हवच आहे .शिवाय मुंबई महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाची सेना मनसेने एकत्र यावे हीच इच्छा आहे म्हणूनच पुन्हा जुळवा जुळव करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.मात्र राज ठाकरे सध्या भाजपच्या जवळ असल्याने हे कितपत जुळून येईल हे सांगता येत नाही .पण काल शर्मिला ठाकरे यांच्या एका विधानाने कुठेतरी आशेचा किरण दिसू लागलंय कारण भाजप किती जारी राजच्या जवळ आली तरी पालिका निवडणुकीत ते मनसेला जास्त जागा देतील असे वाटत नाही त्यातच युज अँड थ्रो ही भाजपची भूमिका राजलही ठाऊक आहे म्हणून निवडणुकीत राज भाजपला मनसेचा खांदा वापरायला देणार नाही तर भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची आहे या पार्श्वभूमीवर जर ठाकरे बंधू झालं गेलं विसरून एकत्र आले तरच मुंबई महापालिका शिवसेना वाचवू शकते त्यामुळे मातोश्रीवरून मनसेला साद घातली जाणार का आणि माणसे त्याला प्रतिसाद देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!