अजमेर सेक्स स्कँडल मधील ६ दोषींना जन्मठेप !
अजमेर- 1992 साली संपूर्ण देशात गाजलेल्या अजमेर सेक्स सकँडल मधील सहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तब्बल 32 वर्षांनी या सेक्स कॅण्डलचा निकाल लागला.
1992 साली राजस्थानातील अजमेर मध्ये शंभरहून अधिक मुलींचे विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून नंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेतील काही मुलींनी नंतर आत्महत्याही केल्या होत्या. राजस्थानचे तात्कालीन मुख्यमंत्री भैरव सिंग शेखावत यांनी सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले त्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आणि 18 आरोपींना अटक करण्यात आली पुढे त्याच्यावर 2001 मध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आले मात्र काही आरोपी पुराव्या अभावी देवदोष सुटले तर एका आरोपीने आत्महत्या केली त्यानंतर उर्वरित सहा आरोपी विरुद्ध जिल्हा सत्र न्यायालयात खटला सुरू झाला आणि बुधवारी न्यायालयाने यातील सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली यामध्ये नफीस चिस्ती, सलीम चिस्ती, नसीब टायगर इकबाल भाटी, मोहम्मद गणी आणि जोहर हुसेन अशा सहा जणांचा समावेश आहे या सहा जणांना जन्मठेपे बरोबरच पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. मोहम्मद चिस्ती हा या संपूर्ण सेक्स कॅण्डलचा मास्टरमाईंड होता