ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्याराजकीय

केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..


 
भिवंडी (आकाश गायकवाड  महाविकास  आघाडी  राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना  देशातील  ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना  करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी  ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. 
 
कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार 
कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना  ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. 
 
असा मिळतो योजनांचा लाभ .. 
अपघाती विमा १ लाख . 
आरोग्य कुटूंब विमा २ लाख 
बेरोजरांना रोजगार भत्ता 
तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे.  
 
बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख 
बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस ) 

error: Content is protected !!